केंद्रीय खर्च निरीक्षक सुरेंद्र पाल सिंग यांची 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी !
पी.वी.आनंदपद्मनाभन
केंद्रीय खर्च निरीक्षक सुरेंद्र पाल सिंग यांनी काल 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी केली. मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनूसार केंद्रीय खर्च निरीक्षक यांनी उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचा हिशोब तीन वेळा तपासावयाचा आहे. त्याअनुषंगाने ही प्रथम खर्च तपासणी काल पार पडली.
केंद्रीय खर्च निरीक्षक सुरेंद्र पाल सिंग यांची, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतची द्वितीय खर्च तपासणी सोमवार दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी व तृतीय खर्च तपासणी रविवार दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 09.00 वाजल्यापासून 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे कार्यालय, वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, जलतरण तलावाजवळची इमारत, डोंबिवली (पूर्व) येथे होणार असून, या खर्च तपासणीचे वेळी उमेदवार/उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी सर्व संबंधित नोंद वह्या-दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, बँक पासबुक अथवा बँक खात्याचे विवरण पत्र, संबंधित प्रमाणके/देयके इ. अभिलेखासह उपस्थित रहावे, असे निर्देश 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिले आहेत. त्याबाबत सर्व उमेदवारांना लेखी अवगत करण्यात आले आहे.